मंगळवार, नोव्हेंबर 11, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

बॅग लिफ्टिंग करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद; नाशिक पोलिसांना यश

नोव्हेंबर 4, 2020 | 2:13 pm
in क्राईम डायरी
0
crime diary 2

नाशिक – बॅग लिफ्टींग करणारी आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात नाशिक पोलिसांना यश आले आहे. दिल्लीतील या टोळीला मध्यप्रदेशातील इंदूर येथे ताब्यात घेण्यात आले आहे. या टोळीकडून इनोव्हा कारसह रोख पैसे असा सुमारे १० लाख ८६ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शहर गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने केली. यासंदर्भात पोलिस उपायुक्त संग्रामसिंग ठाणेदार यांनी माहिती दिली आहे.

हे आहेत टोळीतील साथीदार

कांगत्रम सैल्ली दुराई,पवन मोहन लाल,आकाश मोहन लाल,मनतोश अली मुत्तू,मरियप्पा काली बाबु,विनोद राजेंद्र,साहिल सुरेश व त्यांचा अल्पवयीन साथीदार (रा.सर्व दिल्ली) अशी संशयीतांची नावे आहेत.

नाशकातील घटनेने सुरू झाला तपास

रामचंद्र नामदेव जाधव (रा.बोधलेनगर,ना.रोड) यांनी तक्रार दाखल केली होती. जाधव बुधवारी (दि. ५ आॅक्टो.) आपल्या चारचाकी वाहनातून महात्मा गांधीरोड भागात आले होते. यावेळी ते कारमध्ये बसलेले असतांना एकाने त्यांना गाडीचे ऑईल पडत असल्याचे सांगितले मात्र जाधव यांनी त्याकडे कानाडोळा केला. परंतू काही वेळातच दुसºया व्यक्तीनेही गाडीचे ऑईल लिक होत असल्याचे सांगितल्याने जाधव आपल्या कारखाली उतरले असता ही घटना घडली होती. अज्ञात चोरट्यांनी चालकाच्या आसनापाठीमागील सिटावर ठेवलेल्या दोन बॅगा हातोहात लांबविल्या होत्या. त्यातील एका बॅगेत एक लाख रूपयांची रोकड होती. ही बाब लक्षात येताच जाधव यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती.

असा केला तपास

सरकारवाडा पोलीस आणि युनिट १ चे पथक संयुक्त तपास करीत असतांना युनिटचे निरीक्षक आनंदा वाघ व सहाय्यक निरीक्षक महेश कुलकर्णी यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. संशयीत दिल्ली येथील रहिवाशी असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस संशयीतांच्या मागावर असतांना रविवारी (दि.१) ही टोळी मध्यप्रदेश येथील इंदूर शहरात रवाना झाल्याचे कळले. त्यानुसार निरीक्षक वाघ यांनी सहाय्यक निरीक्षक कुलकर्णी,रघुनाथ शेगर हवालदार येवाजी महाले,विशाल देवरे शिपाई गणेश वडजे आदींचे पथक इंदोर येथे रवाना केले. पथकाने इंदोर शहरातील  हॉटेल आणि लॉजींग पिंजून काढले मात्र संशयीत हाती लागले नाही. परतीच्या प्रवासापुर्वी पोलीसांनी बंजारी ता.प्रिथमपुर या गावाकडे आपला मोर्चा वळविला असता संशयीत पोलीसांच्या हाती लागले. द ग्रीन अ‍ॅपल या हॉटेल जवळून पोलीस फेरफटका मारत असतांना संशयीतांची इनोव्हा (एचआर २६ बीआर ९०४४) पोलीसांच्या नजरेत भरली. पथकाने तात्काळ कार अडवून संशयीतांना बेड्या ठोकल्या.

गुन्ह्याची कबुली

पोलीस तपासात त्यांनी गुह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून गुह्यात वापरलेली इनोव्हा,सात मोबाईल,मिरची लिक्वीड,गलोर,छर्ररे,आणि ७० हजाराची रोकड असा १० हजार ८६ हजाराचा ऐवज जप्त केला. पोलीस तपासात संशयीतांनी महाराष्ट्र,गुजरात,राजस्थान आणि दिल्लीत अश्या प्रकारचे गुन्हे केले असून लॉकडाऊन अनलॉक होताच पुणे, मुंबई,ठाणे,इंदोर,सुरत आणि अहमदाबाद मध्येही असे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. या गुह्याचा तपास सहाय्यक निरीक्षक रघुनाथ शेगर करीत असून संशयीतांना न्यायालयाने सोमवार (दि.९) पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक कोरोना अपडेट- ४१६ कोरोनामुक्त. ३०९ नवे बाधित. १ मृत्यू

Next Post

दिवाळीपूर्वी ७वा वेतन आयोग लागू करा; भुजबळांचे महापालिकेला निर्देश

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा मंगळवारचा दिवस… जाणून घ्या ११ नोव्हेंबरचे राशिभविष्य…

नोव्हेंबर 10, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

दारू पाजून तरुणीवर बलात्कार… अश्लील फोटो व्हायरल करण्याचीही धमकी… मित्रासमवेत शरीरसंबंधांची बळजबरी…

नोव्हेंबर 10, 2025
crime1 1
महत्त्वाच्या बातम्या

पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या तरुणावर थेट तलवारीने सपासप वार… नाशकातील घटना…

नोव्हेंबर 10, 2025
Audi Q3 Signature Line
महत्त्वाच्या बातम्या

भारतात लॉन्च झाल्या ऑडीच्या या लक्झुरीअस कार…

नोव्हेंबर 10, 2025
thandi
मुख्य बातमी

थंडीच्या लाटेबाबत असा आहे हवामानाचा अंदाज…

नोव्हेंबर 10, 2025
bath tub
महत्त्वाच्या बातम्या

अतिशय दुर्दैवी… गरम पाण्याच्या टबमध्ये पडून बालिकेचा मृत्यू…

नोव्हेंबर 6, 2025
575211735 10239725133169293 595243740486033833 n
महत्त्वाच्या बातम्या

टाटा मोटर्सची विश्वविजेत्या महिला संघाला मोठी भेट

नोव्हेंबर 6, 2025
thandi
महत्त्वाच्या बातम्या

पाऊस पुन्हा येणार का? थंडी कधीपासून लागणार?

नोव्हेंबर 6, 2025
Next Post
NMC Nashik

दिवाळीपूर्वी ७वा वेतन आयोग लागू करा; भुजबळांचे महापालिकेला निर्देश

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011