नवी दिल्ली – बिहार विधानसभा निवडणुकांच्या तारखा निवडणूक आयोगाने घोषित केल्या. विधानसभेच्या २४३ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुका तीन टप्यांत होणार आहे. पहिल्या टप्याचे ७१ जागेसाठी मतदान हे २८ आॅक्टोंबरला, दुस-या टप्यात ९४ जागेसाठी ३ नोव्हेंबरला, तर तिस-या टप्यात ७८ जागेसाठी ७ नोव्हेंबरला होणार आहे. मतमोजणी ही १० नोव्हेंबरला होणार आहे.
बिहार विधानसभेचा कार्यकाळ २९ नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळे कोरोना काळात ही निवडणूक घोषित करण्यात आली. शुक्रवारी दुपारी १२.३० वाजता दिल्लीतील विज्ञान भवनमध्ये निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदत घेतली. त्यात या तारखा घोषित करण्यात आल्या.
असे आहे पक्षनिहाय बलाबल
आरजेडी- ८०
जेडीयू- ७१
भाजप- ५३
काँग्रेस- २७
इतर – ५
अपक्ष – ४