नाशिक – गणेशोत्सवाच्या विसर्जनावेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी नाशिक महापालिकेने अनोखा पुढाकार घेतला आहे. कोरोना विषाणूचा संसर्गाला अटकाव करण्यासाठी महापालिकेकडून आता बाप्पाच्या विसर्जनासाठी नाशिककरांना थेट अपॉईंटमेंट देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी नाशिककरांना फक्त विसर्जन स्थळाची नोंदणी करीत आहे. आपल्याला निश्चित वेळ दिली जाणार असून त्याद्वारे आपण विसर्जनासाठी जाऊ शकतो. दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस आणि अनंत चतुर्दशी या दिवशी विसर्जनाची वेळ मिळू शकणार आहे. महापालिकेने तब्बल २९ हजार ५६८ वेळा उपलब्ध करुन दिल्या आहेत. शहरातील सहाही विभागात महापालिकेकडून विसर्जन कृत्रिम कुंड सुविधा उपलब्ध करुन दिल्या जाणार आहेत. जेथे कंटेनमेंट झोन आहे तेथे विसर्जनाचेही नियम राहणार आहेत. यासंदर्भात अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करुन नाशिककरांनी वेळ नोंदवावी, असे आवाहन महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे.
वेळ मिळविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे
https://covidnashik.nmc.gov.in:8002/visarjan/terms