मुंबई – कोरोना महामारीचे पडसाद सर्व स्तरावर पडले आहेत. सण उत्सवांवर देखील कोरोनाचे सावट कायम आहे. विजयादशमी देखील त्याला अपवाद नाही. सोशल मीडियावर एका अँब्युलन्सवर असलेल्या रावणाच्या प्रातिनिधिक रूप घेऊन जातांना दिसते आहे. चक्क रावणालाच कोरोना झाला असल्याने त्यास दवाखान्यात नेण्यात येत असल्याची भावना नेटीझन्सने व्यक्त केली आहे. त्यामुळे यंदाचे रावण दहन होणार नाही अशी भावना सोशल मीडियावर व्यक्त केली जात आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी यंदा रावणदहनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे. याच धरतीवर सोशल मीडियाद्वारे अँब्युलन्सवर असलेल्या रावणाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.