नाशिक – पंचवटी कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या ९२ वर्षांच्या गंगुबाई सोनजे या आजींनी कोरोनावर यशस्वीरित्या केली. त्यामुळेच त्यांचे हॉस्पिटलच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी आजींनीही पंचवटी कोविड हॉस्पिटलचे आभार मानले. कोरोनाचे निदान लवकर झाले तर रुग्ण १०० टक्के बरा होतो. त्यामुळे दुखणे अंगावर काढू नये. लाड मेडिकोज स्वयंसेवकांची टीम मदतीसाठी तत्पर असल्याचे डॉ. निलेश कुंभारे यांनी सांगितले आहे.
बघा, आजींचा सत्कार समारंभ आणि आजींची प्रतिक्रीया