मुंबई – चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूत प्रकरण आणि अभिनेत्री कंगना यांच्या वक्तव्यांमुळे देशभर मुंबई पोलिसांची बदनामी होत असतांंना नाशिक कन्येने पुस्तकाद्वारे सर्वांना चपराक मारली आहे. बिटको महाविद्यालयातून शिक्षण घेवून मुंबईत किर्ती महाविद्यालयाच्या प्राध्यापिका असलेल्या प्रतिभा सोनवणे – बिस्वास यांनी ‘पोलीस नभोमंडळातील २१ आयपीएस नक्षत्रं’ हे पुस्तक लिहले आहे. त्याचे प्रकाशन बुधवारी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये यशवंतराव प्रतिष्ठाण येथे झाले.
या पुस्तकात पोलिस दलात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या २१ पोलीस अधिकाऱ्यांची माहिती बिस्वास यांनी मुलाखतींव्दारे संकलित केली आहे. या पुस्तकामुळे महाराष्ट्र पोलिस काय आहे. हे बदनामी करणा-यांना समजणार आहे. या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी शरद पवार यांनी हे पुस्तक स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक तर केंद्रीय लोकसेवा परीक्षांमध्ये महाराष्ट्रातील यशस्वी उमेदवारांची टक्केवारी वाढवण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त व प्रेरणादायी ठरेल असे सांगितले.
महाराष्ट्राला अनेक नामवंत व कर्तृत्ववान पोलीस अधिकारी लाभले. त्यात वसंत नगरकर, इ.एस.मोडक, जुलियो रिबेरो, अरविंद इनामदार यांची नावे प्रामुख्याने येते. या अधिकाऱ्यांच्या कार्यप्रवासातून सर्वांनाच एक नवी प्रेरणा मिळते. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद हेमंत करकरे, अशोक कामटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी देशासाठी बलिदान देऊन मुंबई पोलीस खात्याचा लौकिक जगभरात पोहचवला. अशा पोलिस अधिका-यांमुळे पोलिसांचे नाव नेहमी उंचावलेले आहे. या सर्वांची प्रेरणा घेवूनच नााशिकच्या प्रतिभा सोनवणे – बिस्वास यांनी ‘पोलीस नभोमंडळातील २१ आयपीएस नक्षत्रं’ हे पुस्तक लिहले. ग्रथांली या पुस्तकाचे प्रकाशक असून या कार्यक्रमात ग्रंथालीचे विश्वस्त सुरेश हिंगलासपूरकर, व कार्यक्रम संयोजक धनश्री धारप हे सुध्दा प्रकाशनला उपस्थित होते. प्रतिभा सोनवणे – बिस्वास यांचे माहेरचे घर नाशिकरोड येथील बिग बाजाराच्या पाठीमागे आहे.