पिंपळनेर – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, कृषिमंत्री दादा भुसे, गुलाबराव पाटील, साक्रीच्या आमदार मंजुळाताई गावीत यांसह उत्तर महाराष्ट्रातील इतर आमदार यांची वर्षा निवासस्थानी गुरुवारी बैठक झाली. या बैठीकीत आमदार मंजुळाताई गवितांनी यांनी विविध मागण्या केल्या. यावेळी त्यांनी साक्री तालुक्यातील जास्त पावसामूळे हातात आलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करावा. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकाचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश देण्यात यावेत. साक्री तालुक्यात लोडशेडिंगमुळे शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत, आणि विशेषतः रब्बी हंगामात हे संकट दरवर्षीचं तयार होतं यासाठी लोडशेंडिंग कमी करून शेतकऱ्यांना मागणी प्रमाणे वीजपुरवठा करण्यात यावा. पिंपळनेर तालुक्याची निर्मिती लवकरात लवकर करण्यात यावी. कांदा निर्यात बंदी त्वरित उठवावी. अमरावती नदीचे पाणी म्हसदी गावात शिरल्याने तसेच काळगाव-नामपूर-मालेगाव- नाशिक या मार्गाचा पाण्यामुळे संपर्क तुटला आहे, या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती व्हावी. साक्री तालुक्यातील २६९ पेक्षा अधिक गावात पेसा कायदयाची अंमलबजावणी होत नाही, या गावात तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच ज्या गावांचे गॅजेट निघाले आहेत ती ऑनलाईन प्रणालीमधे टाकण्यात यावीत अशी मागणी केली.