पिंपळगाव बसवंत : अनेक वर्षांपासून बंदावस्थेत असलेला आणि राजकीय पक्षांनी केवळ सत्तेसाठीच केंद्रबिंदू मानलेल्या निसाकाचा मुद्दा एका व्हायरल व्हीडीओमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. निफाड तालुक्यातील पिंपळस (रामाचे) येथील निसाकाच्या कमानीखालून ऊस वाहतूक करणार्या ट्रॅक्टरचा व्हीडीओ सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी निफाडकरांना आश्वासन दिले होते की, दिलीप बनकर यांना आमदार करा, मी एका वर्षाच्या आत निसाका सुरु करतो. परंतु, आज एक वर्ष उलटूनही कामगार व शेतकरी हा कारखाना चालू होण्याच्या प्रतिक्षेत आहे. परंतु, या आश्वासनाला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले. याच दिवशी पिंपळस (रामाचे) येथील निफाड सहकारी साखर कारखान्याच्या कमानीखालून ऊसाने भरलेले ट्रॅक्टर जात असल्याचे पाहून अनेकांना क्षणभर आनंद झाला. मात्र, सदर ट्रॅक्टर निसाका नव्हे तर कादवा कारखान्यात जात असल्याचे समजताच हा आनंद क्षणात मावळला. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत असला तरी प्रत्यक्षात निसाका सुरू व्हावा, अशी आस अजूनही निफाडकरांना लागून आहे.