मुंबई – महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रलंबित महागाई भत्त्याची रक्कम देण्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे अशी माहिती या प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली.
११ हजार ५७० अधिकारी व कर्मचाऱ्यांना होणार लाभ
या निर्णयाचा लाभ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील सध्या कार्यरत असलेल्या २ हजार ९७० व सेवानिवृत्त झालेल्या ८ हजार ६०० अशा एकूण ११ हजार ५७० अधिकारी व कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. कोरोना विषाणू महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीतही पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यतत्परतेने प्राधिकरणातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.