मुंबई – पार्थ पवार यांचे विधान आणि शरद पवार यांनी त्यांना फटकारल्यानंतर गुरुवारी (१३ ऑगस्ट) दिवसभर पवार कुटुंबियांमध्ये गाठीभेटी होत असल्याचे दिसून आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. तर, सुप्रिया सुळे यांनीही अजित पवार यांची भेट घेतली. तर नातू पार्थ हे सुद्धा शरद पवार यांच्या भेटीसाठी गेले. त्यात काय चर्चा झाली हे अद्याप बाहेर आलेले नाही.