नवी दिल्ली – नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) यूजीसी़-नेट, इग्नू, ओपनमॅट व पीएचडी, दिल्ली विद्यापीठाच्या परीक्षा आणि आयसीएएमआर, एआईईएसह विविध परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर केल्या आहेत.
त्यानुसार यूजीसी नेट परीक्षा १६ ते २५ सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात येणार आहेत. दिल्ली विद्यापीठाची प्रवेश परीक्षा ६ सप्टेंबरपासून घेण्यात येईल. एनटीएच्या वेबसाइटवर विस्तृत माहिती देण्यात आली आहे. ती विद्यार्थी पाहू शकतात.
परीक्षा आणि त्यांच्या तारखा
जीसी नेट : १६-१८ व २१-२५ सप्टेंबर
इग्नू ओपनमॅट : ५ सप्टेंबर
डीयूईटी : ६-११ सप्टेंबर
आयसीएआरए : (यूजी) ७-८ सप्टेंबर
एआयएजीपीईटी : – २८ सप्टेंबर
इग्नू पीएचडी : ४ ऑक्टाेबर