नाशिक – शहर परिसरात केवळ अर्धातासच मुसळधार पाऊस झाला. यामुळे नाशिककरांची मोठी तारांबळ उडाली. दुपारी दीड वाजेपर्यंत कडक ऊन होते. त्यानंतर अचानक वातावरणात बदल झाला आणि काळे ढग दाटून आले. मुसळधार पाऊस सुरू झाल्याने अनेक ठिकाणी नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. अर्ध्या तास चाललेल्या या पावसाने सर्व रस्ते जलमय झाले आणि ठिकठिकाणी पाणी साचले.
पहा व्हिडिओ