नाशिक – नाशिक ग्रामीण पोलीस दल, आडगाव येथील पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले पोलीस हवालदार बाळू दशरथ शिंदे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ५५ वर्षांचे होते. शरीरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने कार्यक्षम पोलिसांना देखील आपले प्राण गमवावे लागत आहेत. कोरोना योद्धा म्हणून काम करतांना शिंदे यांचे निधन झाले आहे. कोरोनामुळे आतापर्यंत शहरात ६ तर ग्रामीण पोलीस दलातील ६ अशा एकूण १२ पोलिसांचा मृत्यु झाला आहे. त्यांच्या पश्चात भाऊ-बहीण, दोन मुले असा परिवार आहे. देशदूतचे मुख्य बातमीदार सुधाकर शिंदे यांचे ते बंधू होत.