नाशिक – शहरासह जिल्ह्यात गुरुवारी (२९ ऑक्टोबर) ३३५ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर ७६६ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एका रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ९३ हजार ०९९ झाली आहे. ८६ हजार ९४४ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार ६६३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या ४ हजार ४४२ जण उपचार घेत आहेत.
गुरुवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक २२१, ग्रामीण भागातील ९२, मालेगाव शहरातील १३ तर जिल्ह्याबाहेरील ९ जणांचा समावेश आहे. तर, नाशिक शहरातील एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ६१ हजार ७०१. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – ७८२. पूर्णपणे बरे झालेले – ५८ हजार २७७. एकूण मृत्यू – ८६३. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – २ हजार ५६१. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९४.४५
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – २६ हजार ५६३. पूर्णपणे बरे झालेले – २४ हजार २२६. एकूण मृत्यू – ५९६.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १ हजार ७४१. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९१.२०
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४ हजार १२७. पूर्णपणे बरे झालेले – ३ हजार ८५२. एकूण मृत्यू – १६६.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – १०९. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ९३.३४
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारी