नाशिक – जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ७३.४८, टक्के, नाशिक शहरात ७६.२१ टक्के, मालेगाव मध्ये ७१.२४ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८३.४२ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७५.२२ इतके आहे.
शहरासह जिल्ह्यात शुक्रवारी (१४ ऑगस्ट) ८८६ नवे कोरोना बधित झाल्याचे निदर्शनास आले. या सर्वांचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले. तर, दिवसभरात ६२७ जणांनी कोरोनावप यशस्वीरित्या मात केली. तसेच, दिवसभरामध्ये आठ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १७ हजार ५८० एवढी झाली आहे. तर ६७६ जणांचा आतापर्यंत बळी गेला आहे. सद्यस्थितीत शहरासह जिल्ह्यात ५ हजार ११५ जण उपचार घेत आहेत. त्यात नाशिक शहरामध्ये ३ हजार ३६६, जिल्ह्यात १ हजार ३०१, मालेगाव शहरात ४३८ तर जिल्ह्याबाहेरील १० जणांचा समावेश आहे. आजवर कोरोना बाधित झालेल्या रुग्णांची संख्या २३ हजार ३७१ एवढी झाली आहे.
तालुकानिहाय उपचार घेत असलेले
नाशिक ३४८
बागलाण ८१
चांदवड ५५
देवळा ६१
दिंडोरी ३२
इगतपुरी ३३
कळवण ४
मालेगाव १०७
नांदगाव १२५
निफाड २१४
पेठ ०
सिन्नर २०५
सुरगाणा ७
त्र्यंबकेश्वर १८
येवला ११