नाशिक – शहरासह जिल्ह्यात शनिवारी (१९ सप्टेंबर) १ हजार ३८७ जण नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर १ हजार ६४२ एवढे कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात एकूण १६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्यांची संख्या ६२ हजार ५०७ झाली आहे. ५१ हजार २६१ जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. आतापर्यंत १ हजार १५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर सध्या १० हजार ९१ जण उपचार घेत आहेत.
शनिवारच्या नव्या कोरोना बाधितांमध्ये नाशिक शहरात सर्वाधिक ८७९, ग्रामीण भागातील ४४२, मालेगाव शहरातील ४७ तर जिल्ह्याबाहेरील १९ जणांचा समावेश आहे. तर, १६ मृतांमध्ये नाशिक शहरातील ६, मालेगाव शहरातील २ आणि ग्रामीण भागातील ८ जणांचा समावेश आहे.
नाशिक शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ४२ हजार ७६६. आतापर्यंत प्रतिबंधित क्षेत्र – २ हजार २२१२. पूर्णपणे बरे झालेले – ३६ हजार २३७. एकूण मृत्यू – ६३६. सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ५ हजार ८९३. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ८४.७३
नाशिक ग्रामीण
आतापर्यंतचे कोरोना बाधित – १५ हजार ९९२. पूर्णपणे बरे झालेले – १२ हजार १२६. एकूण मृत्यू – ३५३.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ३ हजार ५१३. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७५.८३
मालेगाव शहर
आतापर्यंतचे कोरोना बाधित – ३ हजार ३८०. पूर्णपणे बरे झालेले – २ हजार ६४५. एकूण मृत्यू – १४०.
सध्या उपचार घेत असलेले रुग्ण – ५९५. पूर्ण बरे झालेल्यांची टक्केवारी – ७८.२५
सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची तालुकानिहाय आकडेवारीसह सविस्तर वृत्त लवकरच