नाशिक – नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती माजी खासदार देविदास पिंपळे यांची बिनविरोध निवड झाली. संपत सकाळे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिल्याने सभापती निवडीसाठी शुक्रवारी (२८ ऑगस्ट) सभा झाली. त्यात पिंगळे यांची ही निवड करण्यात आली.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाच वर्षापूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत पिंगळे गटाला बहुमत मिळाले होते. त्यानंतर सभापती पदी देवीदास पिंगळे यांची निवड झाली होती. पण, त्यानंतर बाजार समितीच्या भरण्याची रक्कम घऱी नेल्याच्या आरोपावरुन त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने त्यांना पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर चुंबळे सभापती झाले. पण, त्यांनाही लाच घेतांना पकडण्यात आल्यानंतर संपतराव सकाळे सभापती झाले. पण, त्याविरोधात सर्वच संचालक गेल्याने त्यांनी सुध्दा राजीनामा दिला. त्यानंतर ही निवडणूक झाली. त्यात पिंगळे यांचे पुर्नआगमन झाले. जिल्हा उपनिबंधकाच्या अध्यक्षतेखाली सभापतीपदाची ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
चुंबळेचा सवाल
या निवडीनंतर माजी सभापती शिवाजी चुंबळे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असतांना पिंगळे सभापती कसे होऊ शकतात असा सवाल केला आहे. या निवडी विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.