शुक्रवार, मे 9, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकमध्ये आठ-अ उतारा ऑनलाईन

by India Darpan
ऑगस्ट 4, 2020 | 1:27 am
in संमिश्र वार्ता
0
IMG 20200803 WA0031 1

महसूल दिन समारंभ ऑनलाईन संपन्न
नाशिक – महसूल विभाग हा शासन व प्रशासनाचा कणा आहे. या महसूल वर्षात ‘आठ अ’ हा ऑनलाईन उतारा देण्याची सुविधा देखील सुरू करण्यात आली असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. ऑनलाईन महसूल दिन कार्यक्रमात थोरात यांच्यासह अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी कौतुकाची थाप दिली. यासोबत नाशिक विभागातील महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांचा सत्कार करून महसूल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता नाशिक विभागात तंत्रज्ञानाच्या मदतीने ऑनलाईन महसूल दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत नाशिक विभागातील सर्व जिल्हे व तालुक्यातील कोतवालांपासून ते अपर जिल्हाधिकारी असे सर्व साधारण अडीच ते तीन हजार महसूल अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. महाराजस्व अभियानाचे औपचारिक उद्घाटन देखील यावेळी करण्यात आले. तसेच गेल्या महसूल वर्षात प्रत्येक जिल्ह्यात प्रातिनिधीक स्वरूपात उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी कर्मचारी यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.  उपायुक्त दिलीप स्वामी यांनी या कार्यक्रमाच्या निमीत्ताने प्रत्यक्ष व व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ऑनलाईन उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंत्री, अधिकारी, कर्मचारी यांचे आभार मानले.
कोण काय म्हणाले
महसूल मंत्री – शासनाच्या लोकाभिमुख योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचे काम महसूल विभाग करीत आहे. कोरोनाच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता नाशिक विभाग व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून साजरा करत असलेला ऑनलाईन महसूल दिनाचा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. कोविडच्या काळात महसूल विभाग आपली भूमिका कार्यक्षमपणे पार पाडत असून राज्याचे आर्थिक व्यवहार सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी देखील प्रयत्न करीत आहे. सर्वसामान्य नागरीकांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी महसूल विभाग पार पाडत असतो. असेही थोरात यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री –  नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नाशिक विभागातील साधारण २ हजार ५०० अधिकारी कर्मचारी ऑनलाईन एकत्र येण्यास मदत झाली आहे. महसूल विभागाचे काम हे २४ तास व ३६५ दिवस अविरतपणे सुरू असलेले आहे. कोणतीही परिस्थिती असो महसूल विभागाची जबाबदारी ही अत्यंत महत्वाची असते. याअनुषंगाने केलेल्या कामाची वरिष्ठ पातळीवर दखल घेवून शाबासकीची थाप मिळणे आवश्यक आहे, त्यामुळे काम करतांना सकारात्मक उर्जा ही प्रत्येकाला मिळत असते, असे भुजबळ म्हणाले.
कृषीमंत्री – महसूल विभाग हा सर्व विभागांचे प्रतिनिधीत्व करीत असून इतर विभागांवर याविभागाचे नियंत्रण असते. येणाऱ्या काळात सर्वसामान्य नागरिकांना महसूल विभागाच्या माध्यमातून न्याय देण्यात यावा. त्याचप्रमाणे महसूल विभागातील अर्धन्यायिक कामकाजासाठी ठराविक कालावधीचे वेळापत्रक असावे, अशी अपेक्षा भुसे यांनी व्यक्त केली.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

फडणवीस यांचे नाशकात रक्षाबंधन

Next Post

राष्ट्रपतींनी परिचारिकांसमवेत साजरे केले रक्षाबंधन

Next Post
IMG 20200803 WA0023

राष्ट्रपतींनी परिचारिकांसमवेत साजरे केले रक्षाबंधन

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

Nitin Gadkari e1713956790376

केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १ हजार ३८० कोटी रुपयांच्या या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन…

मे 9, 2025
1 2 1920x1026 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा…दिले हे निर्देश

मे 9, 2025
accident 11

भरधाव कारने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार मायलेकी जखमी

मे 9, 2025
crime 88

घरफोडीत चोरट्यांचा १० लाखाच्या ऐवजावर डल्ला…वडाळा पाथर्डी मार्गावरील घटना

मे 9, 2025
GqfRvQmXwAE eHd e1746774742475

आयपीलचे उर्वरीत सर्व सामने स्थगित…बीसीसीआयने घेतला निर्णय

मे 9, 2025
jail11

अल्पवयीन साथीदारांच्या मदतीने चैनस्नॅचिंग करणारा चोर गजाआड…१० गुन्ह्याची कबुली, सहा लाखाचा मुद्देमाल जप्त

मे 9, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011