नाशिक – हल्ली सोशल मीडिया व्यक्त होण्याचे प्रमुख माध्यम झाले आहे. नेटीझन्सतर्फे निरनिराळ्या आशयाच्या पोस्ट शेअर होत असतात. सध्या नाशिक शहरातील ठराविक ठिकाणी होत असलेल्या कामकाजावर विनोदी अंगाने भाष्य करणाऱ्या पोस्ट व्हायरल होत आहेत. यात शहरातील मध्यवर्ती परिसरासह इतर प्रसिद्ध ठिकाणांची नावे व त्यांच्या प्रसिद्धीमागचे कारण चर्चेचा विषय ठरले आहे. पावसाळ्यात सराफ बाजारात साचत असलेल्या पाण्यापासून ते कानडे मारुती लेनमध्ये होणाऱ्या व्यावसायिक गप्पांवरचे भाष्य या मेसेजमध्ये समाविष्ट आहेत. सीबीएस, दही पूल, कॉलेज रोड, त्र्यंबक रोड अशा प्रसिद्ध जागांविषयीची लोकप्रियता यातून दर्शवली आहे.
असा आहे व्हायरल मेसेज…
आता नाशिक म्हणजे [नो offence]
सराफ बाजार : पाणी साचते ती जागा
दही पूल : गटारीच्या झाकणात ट्रक अडकतात ती जागा
मुंबई नाका : नाशिकचे कन्फ्युजन सर्कल
सीबीएस : सक्तीचा यूटर्न मारावाच लागतो ती जागा
मेहेर ते स्तंभ : वरखाली असलेले पायऱ्यांचे रस्ते
रामवाडी ते चोपडा लॉन्स : रात्री लुटले जाते ती जागा
कॅनडा कॉर्नर : सिग्नलचा विळखा असलेली जागा
सिडको : Hide & seek खेळता येते ती जागा
सातपूर : जो तो भाई असतो ती जागा
पेठरोड : रोड डिव्हायडर वर कपडे वाळत घालतात ती जागा
कॉलेज रोड : कुठून ही येऊन activa धडकू शकते ती जागा
मेनरोड : रस्त्याच्या मधून चालणाऱ्या बायकांचे राज्य असलेली जागा
खुटवड नगर : सुसंस्कृत सिडको
इंदिरा नगर : वडाळा, पाथर्डी आणि नाशिकरोड च्या मध्ये गंगापूर रोडचा फील देणारी जागा
नाशिकरोड : फक्त रेल्वे पकडायला गाठावे लागते ती जागा
ध्रुव नगर : मालेगाव आणि चांदवड ला शिकवणाऱ्या शिक्षकांचे रो हाऊस असते ती जागा
आर. टी. ओ.: लायसन्स काढायला जावे लागते आणि पटेल लोकांनी स्वस्तात बिल्डिंग बांधल्या ती जागा
पाथर्डी : अचानक इमारती वाढलेली जागा
वडाळा : एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताना आणि येताना लागतो तो आतून कधीही न पाहिलेला परिसर
त्र्यंबक रोड : नाशिकचा सरकारी रोड
पंडित कॉलनी : नाशिकची वरळी
आकाशवाणी भाजी बाजार : गंगेवर मिळणाऱ्या भाजीपेक्षा तिप्पट दराने भाजी मिळण्याची जागा
नांदूर नाका : नाशिकरोड आणि औरंगाबादला जाणाऱ्या प्रवाश्यांना वेगळे करणारी जागा.
हिरावाडी : पत्ता सांगायला उपयोगी पडणारे रेफरन्सचे ठिकाण
नाशिक midc : आंदोलने करायची जागा
जुने नाशिक : जिथल्या सर्व गल्ल्या बुधा हलवाई जवळ येउन मिळतात तो परिसर
कानडे मारुती लेन : ग्राहक तपासून त्याच्याशी होलसेल अथवा रिटेल करणारी जागा
तिबेटीयन मार्केट : मनपा कडून दुकान लिझ वर घेऊन पोट भाडेकरू टाकायची जागा
फुलेनगर : गुन्हेगारी शिकायचे विद्यापीठ
काळाराम मंदिर परिसर : तामिळ,तेलगू पर्यटक बघायला मिळणारी जागा
गोवर्धन गाव : सुला वाइन कडे जातांना अधून मधून वर्गणी मागायला थांबवणारे उभे असणारी जागा
बापू ब्रिज : गांजा पिण्यास मुभा असलेला भाग
मायको सर्कल : कुरुक्षेत्राच्या युद्धयभूमीत उभे असल्याची अनुभूती देणारी जागा
शरणपूर गाव : ड्राय डे मध्ये पण दारू मिळण्याचे ठिकाण