नाशिक – महानगरपालिकेच्या वतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेची सुरुवात शहरातील ६ विभागांमध्ये एकाच वेळी करण्यात आली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून कोविड मुक्त नाशिक करण्याच्या दृष्टीने १५ सप्टेंबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत सर्व घरांना भेटी दिल्या जाणार आहेत. याद्वारे सारी व इली या आजारासोबत इतर रुग्ण शोधणे बाबत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी शहरात ८०० पथकांच्या माध्यमातून साडेचार लाख घरातील सुमारे १९ लाख नागरिकांची तपासणी केली जाणार आहे. तशी माहिती मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी दिली आहे.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत मधुमेह,ह्रदयरोग,कर्करोग, किडनी आजार,अवयव प्रत्यारोपण, दमा इत्यादी आजाराबाबत माहिती घेतली जाणार आहे.नाशिक शहरातील सुमारे १९ लक्ष नागरिकांची तपासणी केली जाणार असून सुमारे साडेचार लाख घरांची तपासणी या माध्यमातून होणार आहे यासाठी सुमारे ७९४ पथके नियुक्त करण्यात आलेले आहेत. नाशिक पूर्व विभागातील ६ यूपीसीएस सेंटरमधील १५२ पथकाच्या माध्यमातून ८३,६०१ घरांमधील ३,६१,०६६ नागरिकांची तपासणी होणार आहे.
नाशिक पश्चिम विभागातील ४ यूपीसीएस सेंटरमधील १०५ पथकाच्या माध्यमातून ५१,३१२ घरांमधील २,३२,४९९ नागरिकांची तपासणी होणार आहे.पंचवटी विभागातील ५ यूपीसीएस सेंटरमधील ९९ पथकाच्या माध्यमातून ५६,७४९ घरांमधील २,६४,२५६ नागरिकांची तपासणी होणार आहे.नाशिकरोड विभागातील ५ यूपीसीएस सेंटरमधील १४३ पथकाच्या माध्यमातून ६०,७४३ घरांमधील ३,१०,७४० नागरिकांची तपासणी होणार आहे.
नवीन नाशिक विभागातील ६ यूपीसीएस सेंटरमधील १५४ पथकाच्या माध्यमातून १,०५,८५० घरांमधील ४,२४,७७० नागरिकांची तपासणी होणार आहे.सातपूर विभागातील ४ यूपीसीएस सेंटरमधील १४१ पथकाच्या माध्यमातून ८२,३०३ घरांमधील ३,०८,३६२ नागरिकांची तपासणी होणार आहे असे एकूण शहरातील ४,४०,५५८ घरातील १९,०१,६९३ नागरिकांची ७९४ पथकाच्या माध्यमातून तपासणी होणार असून पथकाच्या कर्मचाऱ्यांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त जाधव यांनी केले आहे.