पालकमंत्री भुजबळ यांची माहिती
नाशिक – जिल्ह्यात यंदा पर्जन्यमान कमी आहे. जलसाठाही पुरेसा नाही. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. वेळ पडली तर पाणी कपात करावी लागेल, असे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. सिव्हिलमधील लॅबच्या उदघाटनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ५० टक्केच पाणीसाठा जिल्ह्यातील धरणांमध्ये आहे. गंगापूर धरणसमुहातही गेल्या वर्षीपेक्षा यंदा ५४ टक्के आणि नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात ३४ टक्के पाणी कमी आहे. त्यामुळे नाशिकमध्ये पाणी कपात करण्याशिवाय पर्याय नसल्याचे भुजबळ यांनी स्पष्ट केले. पाण्याचे नियोजन करण्याची वेळ आली आहे. तेव्हाच आपण आगामी वर्ष सर्वांना पाणी देऊ शकू, असे भुजबळ म्हणाले.