शनिवार, ऑक्टोबर 18, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

देशातील पहिली डबल कॉर्ड स्टेम सेल प्रत्यारोपण शस्त्रक्रीया नाशिकमध्ये यशस्वी

नोव्हेंबर 24, 2020 | 12:43 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20201124 WA0014

डॉ. प्रितेश जुनागडे यांनी केले ७ वर्षीय मुलीवर प्रत्यारोपण
नाशिक – देशातील पहिली डबल कॉर्ड स्टेम सेल प्रत्यारोपण शस्त्रक्रीया येथील डॉ. प्रितेश जुनागडे यांच्या लोटस इन्स्टिट्यूट ऑफ हेमॅटोलॉजी, ऑन्कोलॉजी आणि अस्थिमज्जा सेंटर येथे यशस्वीरित्या करण्यात आली. सेल प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेद्वारे गंभीर रक्त आजार असलेल्या ७ वर्षांच्या मुलीवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. या शस्त्रक्रियेमुळे वैद्यकीय क्षेत्रात व नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
या बाबत अधिक माहिती देताना डॉ. जुनागडे यांनी सांगितले की, संगमनेरमधील ७ वर्षाच्या मुलीला अप्लास्टिक ॲनिमिया होता, यामध्ये  शरीरातील  स्टेम सेल्स मधील बिघाडामुळे  शरीरात लाल पेशी, पांढऱ्या पेशी आणि प्लेटलेट्स  तयार होत नाहीत . यामुळे त्या रुग्णाला  गेल्या २ वर्षांपासून वारंवार रक्त आणि प्लेटलेट रक्तसंक्रमण करण्यात येत होते. अशा गंभीर आजारावर  उपचार म्हणजे दुसर्‍याचे “स्टेम सेल्स” देणे जेणेकरून  ते रक्त पेशी तयार करू शकतील.व हे शक्य आहे जर रुग्णाला  कोणी स्टेम पेशी देऊ शकेल असा “दाता” असेल. सामान्यत सख्खे  भावंड (भाऊ व बहीण) स्टेम पेशी दान करू शकतात परंतु भावंडांच्या स्टेम पेशी जुळण्याची शक्यता फक्त  २५ % असते.
लोटस हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या या ७ वर्षीय  रुग्णाची एक लहान बहीण होती, जीची  स्टेम पेशी जन्माच्या वेळी साठवली गेली होती (कॉर्डच्या रूपात) ती १००% जुळली जाईल आणि भविष्यात त्या रूग्णासाठी वापरता येईल या आशेने . पण दुर्दैवाने ही  स्टेम सेल फक्त ५० % जुळत होती, म्हणून त्यांचा वापर करू शकलो नाही असेही डॉ. जुनागडे यांनी नमूद केले.
IMG 20201124 WA0013
स्टेम सेल बँक
आपल्या देशात ब्लड बँक सारख्याच कॉर्ड स्टेम सेल बँका आहेत, जिथे जन्माच्या वेळी गोळा केलेल्या स्टेम सेल्स (आपल्या आईला बाळाशी जोडणारी कॉर्ड) ही काही शुल्क भरल्यानंतर संग्रहित केली जाते. २०१७ पर्यंत चेन्नई येथील लाइफसेल बँक ही  केवळ स्वतच्या  कुटुंबासाठी स्टेम सेल वापरण्याची परवानगी देत असे. परंतु जगभरातील प्रचलित प्रथेमुळे त्यांनी इतर गरजू रूग्णांसाठी साठवलेल्या स्टेम सेलचा वापर करण्यास परवानगी दिली.
असा निवडला पर्याय
सुदैवाने लाईफ सेल बँकेत  अशा दोन संग्रहित कॉर्ड स्टेम सेल्स होत्या सामान्यतः असे १ युनिट वापरले जाते , परंतु आम्हाला अशा २ युनिट्सची आवश्यकता होती कारण एका युनिटच्या स्टेम सेल्सचे प्रमाण “पुरेसे” नव्हते, म्हणून आम्ही दोन्ही स्टेम सेल्स वापरण्याचे ठरविले.  दोन्ही कॉर्ड स्टेम सेल युनिट्स ९० % एकमेकांशी आणि रुग्णाशीही जुळत होती. परंतु या शिवाय अन्य पर्याय नसल्याने “डबल कॉर्ड स्टेम सेल” प्रत्यारोपणा चा पर्याय निवडण्यात आला.
ऑपरेशन च्या २२ दिवसानंतर संक्रमित स्टेम पेशी काम करू लागल्या आणि सर्व  प्रकारच्या रक्त पेशी आता सामान्य संख्येने आहेत.
नाशकात खर्च कमी
“डबल कॉर्ड स्टेम सेल्सचे प्रत्यारोपण हे पहिल्यांदाच होत असून स्टेम सेल चे जतन ही आवश्यक बाब आहे.असे प्रत्यारोपण नाशिक सारख्या तुलनेने लहान शहरात करण्यात आल्याने नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्राच्या प्रगतीवर पुन्हा एकदा शिक्का मोर्तब झाले असल्याचे देखील या प्रत्यारोपण क्षेत्रात आहे.  १२ वर्षाचा अनुभव असलेले डॉ. प्रितेश जुनागडे यांनी नमूद केले. नाशिक सारख्या टायर टू शहरात सर्व प्रगत तंत्रज्ञान तसेच तज्ञ उपलब्ध असून मोठ्या शहरांच्या तुलनेत येथे खर्च देखील कमी येतो .
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कोरोना लसीकरणाबाबत राज्यात टास्क फोर्स; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Next Post

नाशिक – गोविंदनगर परिसरात उड्डाणपुलावर पाच ट्रक एकमेकांवर आदळले, दोन जखमी

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

tejas
महत्त्वाच्या बातम्या

शत्रूला धडकी भरवणारे असे आहे तेजस लढाऊ विमान… मेक इन इंडियाचा बोलबाला…

ऑक्टोबर 17, 2025
प्रातिनिधिक फोटो
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीच्या मुहुर्तावर घरबसल्या खरेदी करा सोने आणि मिळवा १० लाखांपर्यंतचे बक्षिस….

ऑक्टोबर 17, 2025
NMC Nashik 1
महत्त्वाच्या बातम्या

नाशिक शहरातील २८ ठिकाणची एकत्रित पार्किंग निविदा वादात…

ऑक्टोबर 17, 2025
organ donation
महत्त्वाच्या बातम्या

भावनिक क्षण… आईने ‘यकृत’ देऊन वाचविले मुलीचे प्राण…

ऑक्टोबर 17, 2025
IMG 20251017 WA0049
मुख्य बातमी

ओझर येथील कार्यक्रमात ‘तेजस’ लढाऊ विमानासह प्रशिक्षणार्थी विमान राष्ट्राला समर्पित…

ऑक्टोबर 17, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा धनत्रयोदशीचा दिवस… जाणून घ्या, शनिवार, १८ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 17, 2025
dhantrayodashi
महत्त्वाच्या बातम्या

इंडिया दर्पण – दीपोत्सव विशेष – आज आहे धनत्रयोदशी (धनतेरस) – अशी करा पुजा

ऑक्टोबर 17, 2025
dhanatrayodashi
महत्त्वाच्या बातम्या

धनत्रयोदशीला या वस्तू चुकूनही खरेदी करू नका

ऑक्टोबर 17, 2025
Next Post
accident 2

नाशिक - गोविंदनगर परिसरात उड्डाणपुलावर पाच ट्रक एकमेकांवर आदळले, दोन जखमी

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011