नाशिक – दोन दुचाकींमध्ये झालेल्या रस्ते अपघातात दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना शनिवारी (१८ सप्टेंबर) रात्री औरंगाबाद रोडवर घडली आहे. यासंदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव पंडीतराव खैरे (रा. शिवकृपानगर, हिरावाडी) व त्याचा मित्र प्रथमेश धनधाव हे या अपघातात जखमी झाले आहेत. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, खैरे व धनधाव हे हिरावाडीकडे जात असताना मिर्ची हॉटेल चौकात ते वळण घेत होते. त्याचवेळी भरधाव आलेल्या (एमएच १ एएल १७५१) या कावासाकी दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. यात दोघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस हवालदार गायकवाड करीत आहेत.