नवी दिल्ली – कोविड१९च्या साथीच्या काळात कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी स्थगितीचा लाभ घेतलेल्या दोन कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज असलेल्या कर्जदारांचे व्याजावरील व्याज माफ करावे तसेच नियमित कर्जदारांना चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यातील फरकाची रक्कम द्यावी, असा आदेश रिझर्व्ह बँकेने दिला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी ५ नोव्हेंबर पर्यंत करावी, असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. १ मार्च ते ३१ ऑगस्टपर्यंतच्या कालावधीमधील सहा महिन्यांचे व्याजावरील व्याज माफ करावे असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. या निर्णयामुळे लाखो कर्जधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे.