चांदवड – तालुक्यातील दिघवद येथील मंडल अधिकारी राहूल साईनाथ देशमुख (३९, रा. मनमाड) यास लाच घेताना अँटी करप्शन ब्युरोने रंगेहाथ पकडले आहे. शेत जमिनीस वारस म्हणून नाव लावण्यासाठीच्या प्रस्तावावरुन देशमुख याने १० हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यापोटी सहा हजार रुपये घेत असताना देशमुख यास अटक करण्यात आली आहे.