दिंडोरी – शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने नियमांची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी कठोर भूमिका घेत मास्क न वापरणे सोशल डिस्टन्स न पाळणे आदी नियम न पाळणाऱ्या नागरिक व व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई करत सलग दुसऱ्या दिवशी २९ हजरा ६५० रुपये दंड वसूल केला आहे.
दिंडोरी नगरपंचायचे मुख्याधिकारी नागेश येवले यांनी शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी सर्व खातेप्रमुख अधिकारी कर्मचारी यांची बैठक घेत जबाबदाऱ्या वाटून दिल्या आहे. दोन दिवस स्वतः पूर्ण बाजारपेठेत फिरत व्यावसायिक व नागरिकांना नियम पाळण्याचे आवाहन केले. .त्यानंतर भरारी पथकांची स्थापना करता मास्क न वापरणाऱ्या नागरिकांवर तसेच दुकानांपुढे सोशल डिस्टन्स न पाळणारे वेळेनंतर व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. गुरुवारी ४१०० तर शुक्रवारी २९ हजार ६५० रुपयांचा दंड वसुली केली आहे.नागरिकांनी शासनाने केलेल्या सूचना नियमांची अंमलबजावणी करावी असे आवाहन नगराध्यक्ष रचना जाधव,उपनगराध्यक्ष कैलास मवाळ मुख्याधिकारी नागेश येवले व सर्व नगरसेवकांनी केले आहे.