नवी दिल्ली – हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंती निमित्त पंतप्रधान मोदी यांनी गेल्यावर्षी ‘फिट इंडिया’ची घोषणा केली. याअंर्तगत निरनिराळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने यंदाच्या वर्षी ‘फिट इंडिया’ अंतगर्त पंतप्रधान मोदी संवाद साधणार आहेत. कोरोनाच्या काळात आरोग्याची काळजी घेणे प्रार्थनीय असल्याने कार्यक्रमासाठी आवश्यक सूचना तसेच माहितीपर टिप्स पाठवाव्या असे आवाहन करण्यात आले आहे.
आरोग्याच्या दृष्टीने जागरूक राहणे गरजेचे असल्याने त्यादृष्टीने सूचना आणि टिप्स पाठवण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य विषयक कार्यक्रमात संबंधित क्षेत्रातील मान्यवर मार्गदर्शन करणार आहे. यासाठी फिट इंडिया डायलॉग मागवण्यात आले आहेत. विद्यार्थी, कर्मचारी, उद्योजक व इतर सर्व क्षेत्रात काम करणाऱ्यांना यात सहभागी होता येणार आहे. यात आरोग्य विषयांवर चर्चा होणार आहेत. आरोग्यविषयांवर आपले विचार आणि टिप्सचा यात समावेश असला पाहिजे असे स्पष्ट करण्यात आले आहे. यासाठी २४ सप्टेंबर पर्यंत मुदत देण्यात आली असून अधिक माहितीसाठी https://www.mygov.in/group-