डांगसौंदाणे, ता. बागलाण
डांगसौंदाणे-दहिंदुले शिवपांदी या शिवार रस्त्याचे महाराजस्व अभियाना अंतर्गत अतिक्रमण काढण्यात येऊन आदिवासी शेतकऱ्यांचा शिवार रस्ता खुला करण्यात आला आहे. बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे -पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बागलाणमधील बंद असलेल्या शिवार पाणंद रस्त्यांचे महाराजस्व अभियान अंतर्गत शेतकऱ्यांच्या तक्रारींचा व स्थानिक समश्या जानुन घेत रस्ते खुले करण्यात येत आहेत.तालुक्यातील पिंगळवाड़े ते टाक बारे हा ३ किमीचा शिवार रस्ता तर डांगसौंदाणे शिवारातील शिवपांदी रस्ता डांगसौंदाणे मंडळ अधिकारी एन.ज़ी शिरोळे ,तलाठी रेखा गावीत,तलाठी आतीष कापड़नीस यांच्या उपस्थितीत डांगसौंदाणे शिवारातील हा पाणंद रस्ता लोकसहभागातुन मोकळा करण्यात आला आहे. यावेळी शेतकरी बाबुराव वाघ, सुनील वाघ ,राजेन्द्र बागुल, ज्ञानेश्वर बागुल, दौलत पवार, रामदास बागुल, दिलीप पवार आदी शेतकरी उपस्थित होते.