निफाड – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सध्या माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम राबविली जात आहे. याअंतर्गत घरोघरी तपासणी सुरू आहे. मात्र, निफाडच्या प्रांताधिकारी अर्चना पाठारे या अचानक चांदोरी परिसरात आशा सेविकांबरोबर आल्या आणि त्यांनी काही घरी तपासणी केली. त्यामुळे ही बाब संपूर्ण तालुक्यातच चर्चेची ठरली.
माझे कुटुंब माझी जबाबदारी या राज्यव्यापी मोहिम राबविली जात असून एका पथकांत २ ते ३ कोरोनादूत असून ते घरोघरी जाऊन कुटुंबातल्या सदस्यांचं शारीरिक तापमान आणि प्राणवायू पातळी मोजत आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक व्यक्तीच्या आरोग्य स्थितीची माहिती शासनाने दिलेल्या ॲपवर नोंदवून घेत आहेत. सर्वेक्षण झालेल्या घरावर स्टिकर लावलं जात आहे. चांदोरी ता निफाड या गावात आशा सेविका रत्ना गाडेकर,संगीता वारघडे व अनिता अंबोरे या तपासणी करत असतांना शासकीय कामानिमित्त चांदोरी गावात आलेल्या निफाडच्या उपविभागीय अधिकारी डॉ अर्चना पठारे यांनी बघितले. आशा सेविकांचं काम बघून डॉ अर्चना पठारे यांनी ही परिसरात नागरिकांची तपासणी करत कोरोना संबंधी जनजागृती करत आशा सेविकांचं कौतुक केले.
—
आपण स्वतः आपले व कुटुंबाची जबाबदारी घ्यावी, जेणे करून आपल्याला व आपल्या कुटुंबाला कोरोना ची बाधा होणार नाही, अशी काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी तोंडाला मास लावणे, सोशल डिस्टन्सच्या नियमांचे काटेकोर पालन करणे, हात वारंवार सॅनिटायझ करणे अशी काळजी आपण घेतली पाहिजे. किमान आपण आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेतली तर आपण नक्कीच आपले गाव,शहर तसेच जिल्हा कोरोना मुक्त होण्यासाठी हातभार लागेल.
– डॉ अर्चना पठारे, उपविभागीय अधिकारी, निफाड
—
कोरोनाच्या काळामध्ये आशा सेविका कार्यरत असताना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून मनोबल वाढण्यास मदत होते.
रत्ना गाडेकर, आशा सेविका