चांदवड – प्राध्यापक डॉ.दत्ता शिंपी यांच्या The role of physical education and sports in Personality Development. या पुस्तकाचे प्रकाशन झाले. सदर पुस्तकाचे प्रकाशन प्राचार्य डॉ. व्हीं.बी. गायकवाड व महाविद्यालयाचे समन्वय कांतीलालजी बाफना यांचे हस्ते झाले. या प्रसंगी संस्थेचे विश्वस्थ मंडळाचे अध्यक्ष बेबिलालजी संचेती, उपाध्यक्ष दिनेश लोढा, तसेच प्रबंध समितीचे अध्यक्ष अजित सुराणा, प्रबंध समितीचे उपाध्यक्ष झुंबरलाल भंडारी संस्थेचे सचिव जवाहरलालजी आबड, प्रबंध समितीचे सदस्य डॉ. सुनील बागरेचा, सुनिल चोपडा,वर्धमानजी लुंकड, नंदुभाऊ ब्रम्हेचा, शांतीलाल आलिझाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.जी. एच. जैन, प्रशासकीय अधिकारी पी.पी. गालंकर उपस्थित होते.