जिल्ह्यात मार्च २०२० पासून आजतागायत कोविड – १९ च्या प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामीण भागात विकास कामांवर मोठा परिणाम झालेला होता. २०२०-२१ या आर्थिक वर्षापासून केंद्र शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीतून पंचायतराज संस्थांनी ग्रामपंचायतीच्या विकास आराखड्यानूसार कामे व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना महाराष्ट शासनाच्या ग्रामविकास विभागाने निर्गमित केलेल्या आहेत. नाशिक जिल्हा परिषदेस पंधरावा वित्त आयोगा अंतर्गत प्राप्त निधी ग्रामपंचायतींना वितरीत करण्यासाठी नाशिक जिल्हयातील प्रत्येक ग्रामपंचायतींचे वेगळे बँक खाते ग्रामपंचायत स्तरावर निर्माण करुन प्रत्येक ग्रामपंचायतीस त्यांच्या हिशाचा पहिल्या हप्त्याचा निधी वितरण करण्यात आल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी यांनी दिली.
…………..
निधी विहित वेळेत खर्च करावे – बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर, अध्यक्ष
जिल्हयात कोवीड-१९ प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर, गावातील सध्याच्या परिस्थतीचे विश्लेषण करुन गावाच्या गरजा ओळखून कामे घेण्याबाबत ग्रामपंचायतींनी कामे सुचवाची. ग्रामविकासाची मंजुर कृती आराखड्यातील अत्यावश्यक कामे शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे घेण्यात येऊन निधी विहित वेळेत खर्च करण्याची कार्यवाही करण्यात यावी. पंचायत समिती स्तरावर व जिल्हा परिषद स्तरावर प्राप्त निधीतुन शासनाच्या निधी खर्चाच्या मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्यानंतर निधी वितरण व विकास कामे हाती घेण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.
……………
गटविकास अधिकारी यांनी सनियंत्रण करावे – लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा परिषद स्तरावर पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत वेळोवेळी प्राप्त होणारा निधी तात्काळ ग्रामपंचायत स्तरावर वितरीत केला जाईल. वितरीत करण्यात आलेला निधी खर्चाबाबत नियोजन करुन जनहिताची कामे सदर निधीतुन विहीत वेळेत होतील याबाबत गटविकास अधिकारी यांनी सनियंत्रण करावे.