नवी दिल्ली – गॅस सिलेंडर तसेच पेट्रोल, डिझेलचे पेमेंट ऑनलाईन करणाऱ्यांसाठी महत्वाचे वृत्त समोर आले आहे. अँमेझॉन आणि पेटीएमद्वारे पेमेंट करणाऱ्यांना कॅशबॅक मिळतोच मात्र आता खास करून गॅस आणि पेट्रोल, डिझेलसाठी विशेष अँप्लिकेशन समोर आले आहे. ज्याद्वारे ग्राहकांना ५० टक्के कॅशबॅक देखील मिळतो आहे.
दिल्ली येथील उद्योजक रौनक शर्मा यांनी हे अँप्लिकेशन तयार केले असून त्याचे ‘फ्यूल’ ( fyool ) असे नाव आहे. प्ले स्टोअर वरून हे अँप्लिकेशन डाउनलोड करणे सहज शक्य आहे. विशेष सवलती अंतर्गत अँप्लिकेशन डाउनलोड केल्यावर पहिल्या ५०० ग्राहकांना १०० टक्के कॅशबॅक सुविधा देण्यात आली आहे. फ्यूल हे एक भारतीय अँप्लिकेशन असल्याने त्याचा विशेष अभिमान आहे, सर्वसामान्य व्यक्तीला कॅशबॅक सुविधेचा लाभ मिळावा याहेतून अँप्लिकेशन काम करते आहे. या निमित्ताने मध्यमवर्गीक कुटुंबाचे आर्थिक ओझे कमी होण्यास मदत होणार आहे. कॅशबॅक देणारे असंख्य अँप्लिकेशन उपलब्ध आहेत, मात्र सर्वसामान्य लोकांना दैनंदिन व्यवहारात गॅस तसेच पेट्रोल, डिझेल भरतेवेळी कॅशबॅक मिळावा यामुख्य उद्देशाने हे अँप्लिकेशन काम करत असल्याचे रौनक शर्मा यांनी सांगितले. यात पेट्रोल, डिझेलचे बिल अपलोड केल्यावर हमखास कॅशबॅक मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. मिळालेल्या कॅशबॅकद्वारे अँप्लिकेशनमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या वस्तूंची खरेदी देखील करता येते.