धुळे – येथील सरस्वती संगीत विद्यालय यांच्यातर्फे गुरुवर्य कै. अशोक कुलकर्णी स्मृती प्रित्यर्थ ख्याल गायन स्पर्धा २०२० आयोजित करण्यात आली आहे. यंदा ऑनलाईन पद्धतीने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वय वर्ष १४ ते २२ असा पहिला गट आणि २३ वर्ष वयापासून पुढे अशा दोन गटात स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेत संगीत शास्त्राचे शिक्षण घेणारे तसेच हौशी कलाकारांना सहभागी होता येणार आहे. व्यावसायिक गायकांना स्पर्धेत प्रवेश दिला जाणार नाही असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. विजेत्या स्पर्धकांना ई-प्रमाणपत्र आणि रोख रक्कम पारितोषिक म्हणून दिले जाणार आहे. अधिक माहितीसाठी ९९६०४३४५८६ / ९०२८२३३३५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.
हे आहेत स्पर्धेचे नियम…