मंगळवार, जुलै 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

खातेवाटप जाहीर, डॉ. भारती पवार यांच्याकडे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाची राज्यमंत्रीपदाची जबाबदारी

by India Darpan
जुलै 7, 2021 | 5:37 pm
in इतर
0
bharti pawar e1600502510487

विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
नवी दिल्ली – मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॅा. भारती पवार यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडे लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. रावसाहेब दानवे यांच्याकडे रेल्वे राज्यमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे पंचायत राज मंत्रालय देण्यात आले आहे. तर भागवत कराड यांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री ही महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
राज्यातील या मंत्र्याबरोबरच देशातील इतर मंत्र्याचे खाते वाटप करण्यात आले आहे. त्यात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या सहकार खात्याची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे देण्यात आली आहे. तर आरोग्य खात्याचा पदभार आता मनसुख मांडवीय यांच्याकडे देण्यात आला आहे. त्याचबरोबर मांडवीय यांच्याकडे खते आणि रसायन मंत्रालयही असणार आहे. तर अश्विनी वैष्णवर यांच्याकडे रेल्वे खातं देण्यात आले आहे. त्याचबरोबर माहिती आणि तंत्रज्ञान खातेही वैष्णव यांच्याकडे असणार आहे. स्मृती इराणी यांच्याकडे फक्त महिला व बालविकास खात्याची जबाबदारी राहणार आहे. तर विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याची अतिरिक्त जबाबदारी पंतप्रधानांकडे असणार आहे.
धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे केंद्रीय शिक्षण मंत्रीपद देण्यात आले आहे. तर हरदीपसिंह पुरी यांच्याकडे पेट्रोलियम खाते देण्यात आले आहे. ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे नागरी उड्डयण मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पुरुषोत्तम रुपाला यांच्याकडे मत्स्य आणि दुग्धविकास मंत्रालय देण्यात आले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री मिनाक्षी लेखी यांच्याकडे परराष्ट्र मंत्रालय, त्याचबरोबर सांस्कृतिक मंत्रालय असणार आहे. केंद्रीय राज्यमंत्रीपदावरुन कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागलेल्या अनुराग ठाकूर यांच्याकडे केंद्रीय क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याचबरोबर माहिती आणि प्रसारण खात्याची जबाबदारीही त्यांना देण्यात आली आहे. गिरीराजसिंह यांच्याकडे केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पशुपती पारस यांच्याकडे अन्न व प्रक्रिया मंत्रालय सोपवण्यात आले आहे. भुपेंद्र यादव यांच्याकडे केंद्रीय कामगार आणि पर्यावरण मंत्रालय देण्यात आली आहे. तर केंद्रीय राज्यमंत्री मुंजपारा यांच्याकडे महिला व बालविकास खाते देण्यात आले आहे. तर केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांच्याकडे सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्रालयासह कायदा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. सर्वानंद सोनोवाल यांच्याकडे ईशान्य विकास आणि आयुष मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

E5s9cJ9XoActp6v

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

पंतप्रधान मोदींनी भाकरी फिरवली; असे आहे नवे मंत्रिमंडळ

Next Post

आजचे राशिभविष्य – गुरुवार – ८ जुलै २०२१

India Darpan

Next Post

आजचे राशिभविष्य - गुरुवार - ८ जुलै २०२१

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011