नवी दिल्ली – कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर उपचारासाठी आयुर्वेदातील चार औषधे गुणकारी असल्याचे समोर आहे. आयुष मंत्रालयाच्या दिल्लीस्थित रूग्णालय, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद (एआयआयए) या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे. आयुष क्वाथ, संशमनी वटी, फिफाट्रोल आणि लक्ष्मीविलास रास या चार औषधांचा समावेश आहे.
अहवालानुसार, संबंधित अहवाल ३० वर्षीय कोरोना रुग्णाच्या अभ्यासातून समोर आला आहे. दोन दिवस सौम्य लक्षणे आढळून आल्यावर संबंधित रुग्णास भरती करून घेण्यात आले. एआयआयएच्या रोग निदान व पॅथॉलॉजी विभागाचे डॉ.शिरिशर कुमार मंडल यांच्या नेतृत्वात डॉक्टरांच्या पथकाने तिसर्या दिवसापासून रुग्णावर उपचार सुरू केले. दिवसातून तीन वेळा त्याला आयुष डिकोक्शनची १० मिली, २५० मिग्रॅ संशमनी वटी आणि लक्ष्मीविलास रस दोनदा देण्यात आला. तर फिफाट्रॉलचे ५०० मिलीग्राम टॅब्लेट दिवसातून दोनदा देण्यात आले. चौथ्या दिवसापासूनच त्याची प्रकृती सुधारत असल्याचे दिसून आले.
कोरडेपणा, श्वास लागणे, घसा खवखवणे आणि खोकला देखील कमी होत असल्याचे दिसून आले. त्याचप्रमाणे डोकेदुखी, शरीरावर होणारा त्रासही कमी झाला, सहाव्या दिवशीही हा उपचार चालूच होता आणि सहाव्या दिवसाच्या अखेरीस त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. फिफाट्रोल हे पाच प्रमुख औषधी वनस्पती सुदर्शन घन वटी, संजीवनी वटी, गोदंती भस्मा, त्रिभुवन कीर्ती रास आणि मट्यूंजय रास यांपासून बनविलेले आहे. इतर आठ औषधी वनस्पती तुळशी, कुटकी, चिरायता, गुडुची, दारुहरिद्र, अप्पमार्गा, कारंजा आणि मोथाचे भाग आहेत. आयुष क्वाथ हे दालचिनी, तुळस, काळी मिरी आणि सनी यांचे मिश्रण आहे. गिलॉयच्या सालातून संभमनी वटी तयार केली जाते.