नाशिक – कांदा प्रश्नावर प्रहार संघटनने आक्रमक पवित्रा घेत गुरुवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. जिल्ह्यात कांदा व्यापा-यांनी चार दिवसापासून लिलाव बंद केल्यामुळे प्रहार संघटनने हे आंदोलन केले. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर नियंत्रण असते. त्यामुळे प्रहारने हे आंदोलन त्यांच्या मुख्यालयातच केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा लिलाव सुरु व्हावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे.या आंदोलनात प्रहार संघटनेचे जिल्हा प्रमुख शरद शिंदे, उपजिल्हाप्रमुख गणेश निबांळकर, चांदवड तालुका शेतकरी संघटना प्रमुख राम बोरसे, प्रहार जनशक्ती पक्षाचे चांदवड तालुका प्रमुख प्रकाश चव्हाण, संघटक रेवण गांगुर्डे, बागलाण तालुकाध्यक्ष गणेश काकुळते, गणेश रतन शेवाळे व असंख्य शेतकरी यात सहभागी झाले आहेत. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात…. बघा व्हीडिअो