नाशिक – महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च येथे नांदी फाउंडेशनच्या महिंद्रा प्राइड क्लासरूम आणि महिंद्रा ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानाने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या प्रकल्पाअंतर्गत एमबीएच्या विद्यार्थ्यांसाठी १४ ते २१ सप्टेंबर दरम्यान रोजगार व उद्योजकता करीता कौशल्य विकास प्रशिक्षण यावर आधारित सात दिवसीय ऑनलाईन शिबीर घेण्यात आले होते. यात १२५ विद्यार्थी सहभागी झाले होते. व्यक्तिमत्व विकास, कौशल्य व्यवस्थापन, सादरीकरण, आर्थिक साक्षरता, स्वतः ओळख यासारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी उपसंचालक डॉ गणेश तेलतुंबडे, प्रशिक्षण व रोजगार अधिकारी निवेदिता पवार उपस्थित होत्या. नांदी फाउंडेशन च्या समन्वयक सीमा भागवत उपस्थित होत्या.