मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवारांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांना मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे. माझी प्रकृती उत्तम असून केवळ सावधानतेचा उपाय म्हणून डॅाक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. ट्विटमध्ये त्यांनी माझी कोरोना चाचणी पॅाझिटीव्ह आल्याचेही सांगितले. गेल्या चार दिवसापासून पवार हे होम क्वाॅरन्टाईन होते. आज सकाळी ते रुग्णालात दाखल झाले. विश्रांतीनंतर आपल्या सोबत असेल असेही त्यांनी सांगितले.
माझी प्रकृती उत्तम, काळजीचे कारण नाही – अजित पवार
माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिकांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याशा विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशाद्वारे कळविले आहे.