नाशिक – उत्तर महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांमध्ये तब्बल १ हजार ३२४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. सर्वाधिक प्रमाण जळगावमध्ये असून, त्यापाठोपाठ नाशिक शहराचा नंबर लागतो. विभागात कोरोनाने २२ पोलिसांचा बळी घेतला असून आजमितीस २१२ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु आहेत.
उत्तर महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका जळगाव पोलिस दलाला बसला आहे. त्याखालोखाल नाशिक ग्रामीण, अहमदनगर आणि नाशिक शहर पोलिसांचा क्रमांक लागतो. सध्या नाशिक शहरात कोरोनाचा प्रसार जोमाने सुरू असून, त्याचा फटका शहर पोलिसांना बसत असल्याचे वास्तव आहे. आजमितीस नाशिक शहर पोलिस दलातील ७२ पोलिस कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत. शहर पोलिसांसह नाशिक विभागातील २२ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, मृत्यूच्या प्रमाणात नाशिक ग्रामीणने सुरुवातीस घेतलेली आघाडी अद्याप कायम राहिली आहे. यानंतर नाशिक शहर पोलिस दलाचा क्रमांक लागतो. शहर पोलिस दलातील पाच कर्मचारी शहीद झाले आहेत.
जिल्हानिहाय कडेवारी अशी
जिल्हा – कोरोना बाधित – सध्या उपचार सुरु असलेले – मृत्यू
अहमदनगर – २९१ – ३२ – ४
जळगाव- ३५६ – ४९ – ४
नाशिक ग्रामीण – २९१ – ३० – ६
धुळे- ६० – १२ – २
नंदूरबार- ५४ – १७ – १
नाशिक शहर- २७२ – ७२ – ५
एकूण- १३२४ – २१२ – २२
अहमदनगर – २९१ – ३२ – ४
जळगाव- ३५६ – ४९ – ४
नाशिक ग्रामीण – २९१ – ३० – ६
धुळे- ६० – १२ – २
नंदूरबार- ५४ – १७ – १
नाशिक शहर- २७२ – ७२ – ५
एकूण- १३२४ – २१२ – २२