सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ या प्रकाराची चलती आहे. टिकटॉक बंद झाल्यानंतर किंवा भारताने टिकटॉकवर बंदी आणल्यानंतर शॉर्ट व्हिडिओच्या क्षेत्रामध्ये अनेक कंपन्या येत आहेत.
इंस्टाग्रामने “रिल्स” आणून काही दिवस झाले आहेत. आता तर हे अधिकृत बटण त्यांनी इंस्टाग्रामवर उपलब्ध करुन दिले आहे. याच पावलावर पाऊल टाकून यूट्यूबनेही आता Shorts नावाची सुविधा आणली आहे. ती तुम्हाला युट्युबवर उपलब्ध होईल. त्याद्वारे तुम्ही पंधरा सेकंदाचे व्हिडिओ करू शकता, याच्यात अन्य सोयीही आहेत, त्या वापरुन आपण बघू शकता.
खरं म्हणजे युट्युबची सुरुवात झाली ती एका अठरा सेकंदाच्या व्हिडिओने! नंतर युट्युब चे स्वरूप खूप मोठे झाले. तीच आठवण ठेवून युट्युब ने बहुधा हे पंधरा सेकंदाचे Shorts सुरू केले आहे. अमेरिकेत टिक टॉक चे काय होईल यावरून वाद चालू आहे, पण भारत इंटरनेट वापरणाऱ्यांंचे खूप मोठ मार्केट असल्यामुळे भारतात Reels आणि शॉर्टस यांचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होणार यात शंका नाही.
- नेटकर्मी