नाशिक – ‘आरोग्य चिंतन’च्या ‘चला आरोग्य संपन्न होऊ या’ व्याख्यानमालेत उद्या (सोमवार दि. १७ ऑगस्ट) रात्री साडे आठ वाजता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांचे व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानानंतर गेली २५ दिवस सुरू असलेल्या व्याख्यानमालेचा समारोप होणार आहे. नागरिकांना फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून हे व्याख्यान ऐकता – पहाता येईल. करोनाच्या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. डॉ. म्हैसेकर यांनी या संदर्भात अभ्यास करून नोंदवलेली निरीक्षणे आणि उपाययो ना या व्याख्यानाच्या माध्यमातून ऐकण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. या व्याख्यानमालेत राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, नवी दिल्लीतील आयुष- एम्स चे सहसंचालक डॉ. उमेश तागडे यांनीही मार्गदर्शन केले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी https://www.facebook.com/arogyachintan या लिंक द्वारे व्याख्यानाचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य चिंतनचे संपादक वैद्य विजय कुलकर्णी यांनी केले आहे.