नाशिक – उपनगर येथील आधार कार्ड केंद्रात होणाऱ्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला असून स्थानिक रहिवाश्यांना या गर्दीचा मोठा त्रास होत आहे. याबाबत जिल्हा प्रशासनास वारंवार विनंती करूनही यावर उपाययोजना करण्यात आलेली नसल्याची येथील स्थानिकांची तक्रार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी करण्याचे टाळण्याचे आवाहन राज्य शासनाने केले असून त्याची अंमलबजावणी जिल्हा प्रशासन करताना दिसत नाही. विद्यार्थ्यांच्या हिताकरिता सरकारने गर्दी न करता आधारकार्ड केंद्र सुरु करण्यास परवानगी दिली. परंतु उपनगर मधील आधार केंद्रात प्रमाणाच्या बाहेर गर्दी बघावयास मिळत. आधार कार्ड केंद्र असलेल्या ठिकाणी कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून याठिकाणी दोन कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू देखील झाला आहे. याबाबत जिल्हा प्रशासनास आधार कार्ड केंद्र इतरत्र हलविण्यास विनंती करूनही त्यावर प्रशासनाने उपाययोजना केलेल्या नाही. आधार कार्ड केंदात होणाऱ्या गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडलेला दिसून येत असून यातील काही व्यक्ती मास्कचा वापरही करताना नाही. तसेच आधार कार्ड केंद्रात सॅनिटायझरचा वापर होताना दिसत नाही. आधार कार्ड केंद्रात आलेल्या व्यक्तींची वाहने रस्त्यात उभी राहत असल्याने स्थानिकांना वहिवाटीस अडचण निर्माण होत असून शाब्दिक चकमक होत आहे. उपनगर परिसरात कोरोना बाधितांची संख्या वाढत असून यात आधार कार्ड केंद्रावर होणाऱ्या गर्दीमुळे कोरोनाचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
उपनगर परीसारातील नवीन चाळ मध्ये जिल्हा प्रशासनाच्या मालकीच्या जागेवर खाजगी आधार कार्ड केंद्र सुरु आहे. नवीन चाळ परिसरातील रस्ता छोटा असल्याने आधार केंद्रात होणाऱ्या गर्दीमुळे व आलेल्या वाहनांमुळे वाहतुकीस मोठी अडचण निर्माण होत आहे.