न्यूयॉर्क – अमेरिकन राष्ट्रपदाच्या निवडणुकीत बुधवारी भारतासाठी एक मोठी घडामोड घडली. भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षाने उपराष्ट्राध्यक्षपदासाठी निवड केली आहे. त्यामुळे अमेरिकेत पहिल्यांदाच भारतीय वंशाच्या महिलेला संधी मिळाली आहे. त्या सध्या सिनेटर असून उपराष्ट्राध्यक्ष पदासाठी त्या प्रबळ उमेदवार ठरणार आहेत.
डेमोक्रॅटिक पक्षाचे राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडेन यांनी कमला यांच्या निवडीची घोषणा केली आहे. कमला यांचा विजय झाल्यास पहिल्यांदाच अमेरिकेत महिला उपराष्ट्राध्यक्ष असतील. तसेच भारतासाठीही त्या भूषणावह असतील. अमेरिकेतील १३ भारतीयांची मते आणि अन्य कृष्णवर्णीय मतदार यामुळेच कमला यांना संधी दिल्याचे बोलले जात आहे. कमला यांच्या आई श्यामला या चेन्नईच्या होत्या. अमेरिकेत त्या शिक्षणासाठी गेल्या. तेथे पीएचडी केली. त्यानंतर जमैकाच्या डोनाल्ड हॅरिस यांच्याशी त्यांनी लग्न केले. काही वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला. कमला या अत्यंत हुशार आहेत. त्यांच्यारुपाने उत्तम नेतृत्व अमेरिकेला मिळेल, असा विश्वास बायडेन यांनी व्यक्त केला आहे.