रविवार, ऑगस्ट 31, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

अभिमानास्पद! मनपा शाळेची विद्यार्थिनी पूनमची जागतिक बाल शांतता पुरस्कारासाठी निवड

by Gautam Sancheti
नोव्हेंबर 4, 2020 | 2:19 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
IMG 20201020 WA0017

नाशिक – पाथर्डी गावातील महापालिका शाळा क्रमांक ८६ येथील विद्यार्थिनी पुनम गौतम निकम हिची जागतिक बाल शांतता पुरस्कारासाठी निवड झाली आहे. या पुरस्कारासाठी जगातील ४२ देशांमधून निवडलेल्या १४२ मुलांच्या यादीत भारतामधून पूनम आणि इतर दोघींची निवड झाली आहे. त्यामुळे ही बाब नाशिककरांसाठी अभिमानास्पद आहे.
पुनमचे वडिल एका कंपनीत वॉचमन म्हणून काम करतात तर आई एका हॉस्पिटलमध्ये सफाई कामगार म्हणून काम करते. पुनमला आणखी तीन बहिणी आहेत. अत्यंत हलाखीची परिस्थितीत हे कुटुंब राहते. अशा परिस्थितीतच चारही मुली महापालिकेच्या शाळेत शिक्षण घेत आहेत. पुनम अतिशय हुशार असून करकामासह विविध बाबीत ती निपुण आहे. तसेच स्वच्छता तिला खुप आवडते. अवघ्या १३ वर्षे वयाची असलेल्या पुनममध्ये मोठा समजूतदारपणा आहे. मनपा शिक्षण विभाग, सी.वाय. डी. ए. संस्था, जीएसके फार्मा आणि सेव्ह द चिल्ड्रेन यांच्या संयुक्त विद्यमाने मनपा शाळांमध्ये आरोग्यदायी शाळा वातावरण हा उपक्रम राबविला जात आहे. याचअंतर्गत पुनमला मासिक पाळी संदर्भात विविध प्रश्न निर्माण झाले. त्याचे शंकानिरसन तिने सीवायडीएच्या प्रकल्प कर्मचारी पूनम दिदी यांच्याकडून करुन घेतले. त्यानंतर तिने मासिक पाळीबाबत अधिक माहिती घेतली. यासंदर्भात तिने तिच्या घरात, शाळेतील मैत्रिणी, परिसरातील कुटुंब यांच्यामध्ये जनजागृती करीत आहे.
IMG 20201020 WA0016 1
इतक्या लहान वयात अत्यंत सोप्या शब्दात ती मासिक पाळीविषयी उत्तम माहिती देते. याची दखल घेत मनपा शिक्षण विभाग, सी.वाय. डी . ए. संस्था आणि सेव्ह द चिल्ड्रेन यांच्या संयुक्त विद्यमाने पूनम निकमचे नामांकन जागतिक बाल शांतता पुरस्कारासाठी करण्यात आले. या पुरस्कारासाठी जगातील ४२ देशांमधून निवडलेल्या १४२ मुलांच्या यादीत भारतामधून पूनम आणि इतर दोघींची निवड झाली आहे. याची दखल घेत महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी पूनमचे अभिनंदन केले आहे. याप्रसंगी मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी सुनिता धनगर, सीवायडीएचे प्रकल्प समन्वयक सोपान दाबेराव, सेव्ह द चिल्ड्रन या संस्थेचे प्रकल्प समन्वयक गणेश ताठे, मुख्याध्यापक अर्जुन राजभोज, पद्माकर बागड आदी उपस्थित होते.
IMG 20201020 WA0045
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक कोरोना अपडेट- ५५९ कोरोनामुक्त. ४३४ नवे बाधित. ३ मृत्यू

Next Post

राज्यातील १०६१ पोलीस अंमलदार झाले पोलीस उप निरीक्षक

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

cpm
संमिश्र वार्ता

मोहन भागवत यांच्या या वक्तव्याचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा पॉलिट ब्यूरोने केला निषेध…

ऑगस्ट 31, 2025
manoj jarange
महत्त्वाच्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांचा मोठा निर्णय…उद्यापासून पाणी पिणं बंद करणार

ऑगस्ट 31, 2025
FB IMG 1756617600817
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत हालचाली वाढल्या… आज उपसमितीची पुन्हा बैठक, अजित पवारही मुंबईकडे रवाना

ऑगस्ट 31, 2025
Sharad Pawar
महत्त्वाच्या बातम्या

आज शरद पवार घेणार आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांची भेट…

ऑगस्ट 31, 2025
cbi
संमिश्र वार्ता

सीबीआयची मोठी कारवाई….२३२ कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी विमानतळाचा हा अधिकारी गजाआड

ऑगस्ट 31, 2025
fir111
आत्महत्या

विवाहीतेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळीविरोधात गुन्हा दाखल

ऑगस्ट 31, 2025
manoj jarange
संमिश्र वार्ता

कधीपर्यंत भाजपची री ओढणार…राज ठाकरे यांच्यावर मनोज जरांगे पाटील यांची टीका

ऑगस्ट 31, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी खर्चावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, ३१ ऑगस्टचे राशिभविष्य

ऑगस्ट 30, 2025
Next Post
police1 1140x570 1 e1656425224594

राज्यातील १०६१ पोलीस अंमलदार झाले पोलीस उप निरीक्षक

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011