मुंबई – राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरच मोठी बातमी समोर आली आहे. विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. येत्या ७ व ८ सप्टेंबर रोजी हे अधिवेशन होणार आहे. आता अध्यक्षांनाच कोरोना झाल्यामुळे अधिवेशनावर चिंतेचे सावट आहे.
अधिवेशनासाठी मुख्यमंत्र्यांसह सर्व आमदारांना कोरोना चाचणी सक्तीची करण्यात आली आहे. अशा पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षच कोरोनाबाधित झाले आहेत. त्यामुळे ते अधिवेशनाला उपस्थित राहणे शक्य नाही. त्यामुळे उपाध्यक्षांद्वारे अधिवेशनाचे कामकाज चालणार की अन्य काही पर्याय आहे, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.