ग्रंथसंपदा :
– सृजनभान, सांजवर्खी शकुन हे कवितासंग्रह प्रकाशित
– विविध वृत्तपत्रे तसेच नियतकालिके व दिवाळीअंकातून कथा,कविता,लेख प्रकाशित
आगामी :
– ‘सावलीचे गजरे’हा ललितलेख संग्रह
– ‘कॉफीमुन,चंद्रगात्री’ हे काव्यसंग्रह
सहभाग :
– दैनिक संचार – सोलापूर, दैनिक पुढारी – कोल्हापूर, दैनिक गाववाला – परभणी,दैनिक पुण्यनगरी – सोलापूर दैनिक जनादेश – ठाणे यांत सदर व स्तंभलेखन.
– विविध पुस्तकांवरील समिक्षा व परीक्षण वर्तमान पत्रातूंन प्रसिद्ध.
सामाजिक :
– समरसता साहित्य परीषद पिंपरी चिंचवड – कार्यकारीणी सदस्य
– महाराष्ट्र कामगार साहित्य परिषद कार्यकारी विश्वस्त
– पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला आकादमी,मुख्य कार्यवाह
– यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान,पिंपरी चिंचवड विभाग,सदस्य
मानसन्मान व पुरस्कार :
– शब्दधन काव्यमंच यांचा ‘छावा’काव्यपुरस्कार
– नवयुग साहित्य व शिक्षण संस्थेच्या श्रावणी काव्य स्पर्धेत पुरस्कार
– कोकण मराठी साहित्य परिषद,रत्नागिरी यांच्या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक प्राप्त
– सर्वोदय साहित्य संस्था,कोल्हापूर यांचा ‘ सर्वोदय साहित्य पुरस्कार’
– बाल कुमार साहित्य सभा,कोल्हापूर यांचा ‘साहित्यसृजन’ पुरस्कार
– आवाज महाराष्ट्राचा या न्युज चॅनेल चा ‘ क्रांतीज्योती’ पुरस्कार
– महाकवी कालीदास प्रतिष्ठान,पुणे यांचा ‘कालीदास काव्यगौरव’ पुरस्कार
– ग.दि.मा. प्रतिष्ठान,पुणे महाराष्ट्र साहित्य परिषद,भोसरी व कामगार साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य यांचा ‘ गदिमा साहित्य पुरस्कार’
उपक्रम :
– कवितासखी हा स्वरचित कवितांचा कार्यक्रम
– स्वतःच्या कथांच्या अभिवाचनाचे प्रयोग
– ही कविता आली तुम्हास भेटायला हा समूह कवितांचा कार्यक्रम
मानसी चिटणीस यांच्या ‘काचपारवे’या कवितेचे अक्षरचित्र आपल्यासाठी…
–विष्णू थोरे,चांदवड