इंडिया दर्पण ऑनलाइन डेस्क – एकापेक्षा एक दर्जेदार मालिका देणाऱ्या ‘झी मराठी’ वाहिनीवर आणखी एक नवी मालिका येऊ घातली आहे. त्यामुळे झी मराठीच्या प्रेक्षकांसाठी दिवाळीत मनोरंजनाचा डबल धमाका असणार आहे. ‘झी मराठी’वर नुकताच एका नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे. आता नवी मालिका येणार म्हटल्यावर, एखादी जुनी मालिका निरोप घेणार हे नक्की. तेव्हा कोणती मालिका निरोप घेणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. त्याचीही चर्चा सुरू झाली आहे.
शिल्पा तुळसकर आणि स्वप्नील जोशीची ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेऊ शकते आहि चर्चा आहे. याबद्दल अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही. पण नव्या मालिकेच्या प्रोमोने प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली आहे. तो रिदमचा बादशहा तर ती सुरांची राणी असलेल्या या मालिकेचे नाव ‘हृदयी प्रीत जागते’ असं आहे. या प्रोमोमध्ये नायिका आणि नायक या दोघांची संगीतमयी जुगलबंदी दाखवण्यात आली आहे. त्यामुळे प्रोमो बघता ही मालिका म्युझिकल बेस असणार आहे, असा अंदाज आहे. मालिकेचं टायटल साँगही प्रदर्शित झालं आहे.
तो रिदमचा बादशाह ती सुरांची राणी कशी असेल यांची प्रेम कहाणी? ????????
नवी मालिका 'हृदयी प्रीत जागते'
7 नोव्हेंबरपासून. सोम ते शनि, रात्री 8 वा. #HrudayiPreetJagate#ZeeMarathi pic.twitter.com/qek6vUa456— Zee Marathi (@zeemarathi) October 8, 2022
‘हृदयी प्रीत जागते’ ही मालिका ७ नोव्हेंबरपासून सोमवार ते शनिवारी रात्री ८ वाजता सुरू होणार आहे. त्याचमुळे ८ वाजता सुरू असणारी ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे, अशी चर्चा ऐकायला मिळतेय. या नव्या मालिकेत अभिनेता सिद्धार्थ खिरिड प्रमुख भूमिकेत आहे. सिद्धार्थ याआधी ‘फ्रेशर्स’ सारख्या मालिकेत दिसला होता. सध्या तो ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत सिद्धार्थ भोसलेची भूमिका साकारत होता. सप्टेंबर महिन्यातच सिद्धार्थनं ही मालिका सोडली. सिध्दार्थसोबत मालिकेत एक नवा चेहराही पाहायला मिळणार आहे. अभिनेत्री पूजा कातुर्डे या मालिकेत नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. नव्या मालिकेने प्रेक्षक खुश झाले असले तरी सौरभ – अनामिकाची प्रेमकथा पुन्हा अपूर्णच राहणार का याबद्दल मात्र चिंता व्यक्त केली जात आहे.
सौरभला राधाचं खूप कौतुक वाटतं.
सोम-शनि, रात्री 8:00 वा.#TuTevhaTashi #ZeeMarathi
आता तुमची आवडती मालिका कधीही कुठेही पाहण्यासाठी https://t.co/9q8IXyfdUG या लिंकवर क्लिक करा. pic.twitter.com/tx7TJaK9LN
— Zee Marathi (@zeemarathi) October 10, 2022
Zee Marathi New TV Serial form 7 November