नाशिक – शिवसेनेतील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह नाशिक, सिन्नर, त्र्यंबकेश्वर येथील अनेक तरुण सामाजिक कार्यकर्त्यांनी आज मनसेच्या ‘राजगड’ कार्यालय येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला.
यावेळी प्रवेश घेणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने शिवसेना अवजड वाहतूक सेनेचे जिल्हा प्रमुख विश्वास तांबे पाटील व अल्तमस शेख, उपजिल्हा प्रमुख, संदीप दळवी, शिवसेना उपविभाग प्रमुख कैलास जाधव, भाजपचे २०१७ मनपा निवडणुक उमेदवार याग्निक शिंदे, शिवसेना माजी विभाग प्रमुख तुषार मटाले, शिवसेना २०१७ मनपा निवडणुक उमेदवार विकास काळे, अनंत सांगळे संस्थापक अध्यक्ष, सांगळे फाऊंडेशन, सुवर्णा अनंत सांगळे, जगदीश कांगणे, बाळासाहेब दोंदे, गणेश शेवरे, जिल्हा अध्यक्ष – एकलव्य फाऊंडेशन, धर्मराज खोडके, इगतपुरी अध्यक्ष, सांगळे फाऊंडेशन, ऋषिकेश कांबळे – सर्पमित्र, आशिष दातीर – व्यवसायिक, सामाजिक कार्यकर्ता, शरद निमसे – शिवसेना, धरम गोविंद, भरत सूर्यवंशी, सिन्नर येथील डॉ. श्रीकांत भडांगे, अभि. मनोज हेमके, प्रशांत बर्डे, सचिन भालेराव, रावेंद्र कोल, श्रुती रायते, अभिजित रहाटळ, सचिन ओझा, शीतल शेळके, माही रावत, रामनाथ बर्डे, अमित दळवी, मेल्विन डिसुजा, योगेश डुंबरे, शरद निमसे, बाळू कसबे, नारायण काकडे, फिरोज शेख, राजु गुंजाळ, जिभाऊ शिरसाठ, मनोज सांगळे, निलेश कोठावदे, उत्तम एखंडे, दिव्यांग आघाडीचे सचिन गंगाराम पानमंद, मुकेश दिलीप कोठुळे, राजेंद्र साळवे, सागर कडवे, राजू साळुंखे, किरण सोनवणे, रेखा साळवे, कविता सिंग, जोशना सोनार, हिरामण पारचे, हॉटेल जत्रा परिसरातील अॅड. सोनल कदम , नंदा चव्हाण, राखी जाधव, नैना कसारे, नैना लोणावत, त्र्यंबकेश्वर येथील अनिल चोथे, अक्षय कसबे, समाधान गुंजाळ, गौरव देशमुख, दिपक कसबे, रवी घुले, दिपक खंडारे, आदित्य पाटील, चेतन खंडारे, अक्षय झोटे, सुरेश पाटील, हेमंत कसबे, रवी पेहरे, मुकेश गुंजाळ आदींचा समावेश आहे.
याप्रसंगी राज यांच्यासह मनसे नेते बाळा नांदगांवकर, अनिल शिदोरे, संदिप देशपांडे, डॉ. प्रदिप पवार, प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष अड. रतनकुमार इचम, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, शहर समन्वयक सचिन भोसले आदी उपस्थित होते.