मुंबई – प्रत्येकालाच वाटते की आपली शरीरयष्टी सडपातळ असावी परंतु सर्वांना ते शक्य नसते. याला कारण म्हणजे आजच्या काळात अयोग्य आहार, ताणतणावपूर्ण जीवनशैली आणि आळशीपणा यामुळे अनेक जण लठ्ठपणाचे बळी ठरतात. वाढत्या वजनामुळे किंवा लठ्ठपणामुळे आपल्या बाह्य व्यक्तीमत्व किंवा सौंदर्यावरच परिणाम होत नाही तर त्यामुळे अनेकदा आपण आरोग्य समस्यांनाही बळी पडतात.
कधीकधी लठ्ठपणामुळे मधुमेह, हृदयाच्या समस्या आणि इतर आजारांना बळी पडण्याचा धोका देखील वाढवतो. त्यामुळेच आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे की, आपले वजन नियंत्रणात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. लठ्ठपणापासून मुक्ती मिळवण्यासाठी काही जण वेगवेगळे उपाय करतात. काही नागरिक डायटिंग करतात तर काही स्त्री -पुरूष जिममध्ये तासनतास घाम गाळतात. मात्र, योगगुरू बाबा रामदेव यांच्या म्हणण्यानुसार, योगा करण्यासोबतच काही नैसर्गिक उपायांचा अवलंब केल्यास काही दिवसात वजन कमी होऊ शकते. बाबा रामदेव यांनी अशा ५ टिप्स दिल्या आहेत, ज्याचा नियमित अवलंब केल्यास एका महिन्यात वजन १० किलोपर्यंत कमी करता येते. जाणून घ्या काय आहेत त्या टिप्स-
कपालभाती
नियमित ४५ दिवस कपालभाती केल्याने १० किलोपर्यंत वजन कमी करता येते. कपालभातीच्या माध्यमातून शरीरातील अतिरिक्त चरबी तर कमी करता येतेच, पण यकृत आणि किडनीशी संबंधित समस्यांपासूनही सुटका मिळते. हा प्राणायाम मनाला तणावमुक्त ठेवण्यासही मदत करतो. याशिवाय, शरीराला डिटॉक्सिफाय करून, विषारी पदार्थ बाहेर टाकतात, त्यामुळे पचनशक्ती देखील सुधारते.
कोमट पाणी
दररोज एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने एका महिन्यात किमान २ किलो वजन कमी होऊ शकते. कोमट पाणी शरीराला हायड्रेट ठेवते, तसेच शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
साखर
बाबा रामदेव यांच्या मते, लठ्ठपणा कमी करण्यासाठी आपल्या आहारातून साखर खूप कमी करावी लागेल, कारण लठ्ठपणा वाढण्यामागे साखर हे एक प्रमुख कारण आहे. साखरे इथूनच मधुमेह आणि लठ्ठपणा यासारखे आजार उद्भवतात.
जेवणानंतर वज्रासन
जेवणानंतर वज्रासन केल्याने लठ्ठपणा कमी होण्यास मदत होते. त्यामुळे लठ्ठपणापासून मुक्ती मिळवण्यासाठी योगगुरू रामदेव बाबा वज्रासन करण्याचा सल्ला देतात.
उपवास
आठवड्यातून एक दिवस उपवास केल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते, असेही तज्ज्ञांचे मत आहे. एक दिवस उपवास करून आपला रक्तदाब आणि रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी कमी करता येते.