अजय सोनवणे, इंडिया दर्पण वृत्तसेवा
सण व उत्सवाची परंपरा आणि संस्कृती जपणारे येवला शहरातील नागरिक तेवढ्याच उत्साहात प्रत्येक सणांचा आनंद लुटत असतात. येवले शहरातील गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या धडपड मंचतर्फे यावर्षी मेनरोड येथे रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने ७ फुटी राखी लावण्यात आली आहे. गेल्या १६ वर्षांपासून धडपड मंचाचे वतीने ही राखी लावण्यात येत आहे. विशेष म्हणजे दरवर्षी वेगवेगळ्या डिझाईन या राखीवर करण्यात येत असतात. यावेळी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असल्याने तिरंगा झेंडा देखील या राखीवर लावण्यात आला आहे. धडपड मंचाची ही मोठी राखी नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.